सर्व रेशनकार्ड धारक कोविड रुग्णांवर मोफत उपचार

Foto
महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी पत्राद्वारे महाराष्ट्रातील महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हा समन्वयक यांना खाजगी हॉस्पिटल्सवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेच्या निकषानुसार सर्व रेशन कार्डधारक या योजनेसाठी पात्र आहेत.
पात्र रुग्णांना योजने अंतर्गत उपचार नाकारणार्‍या तसेच रुग्णांकडून बिल घेणार्‍या रुग्णालयावर तात्काळ कारवाई करण्यात यावी म्हणजेच ज्या पात्र रुग्णांकडून या अगोदर पैसे आकारण्यात आलेले आहे ते चुकीचे आहे म्हणून त्या रुग्णांना रिफंड करावे असे आदेश देण्यात आलेले आहेत.कुठल्याही हॉस्पिटल मध्ये रेशन कार्ड धारक रुग्णांकडून पैसे आकारण्यात येऊ नये व कोविड रुग्णांकडे रेशन कार्ड सध्या उपलब्ध नसेल तरी इटीआय घेऊन उपचार सुरू करावे. योजनेनुसार पात्र असलेल्या सर्व रेशन कार्डधारक रुग्णांना मोफत व निःशुल्क उपचार मिळत आहेत याची खातरजमा करण्याचे आदेश या पत्राद्वारे देण्यात आलेले आहे.बिलासंदर्भात व मोफत उपचारासंदर्भात हॉस्पिटल्स मधील आरोग्य मित्र व जिल्ह्यातील जन आरोग्य अधिकारी यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker